अथांग
अथांग
मन अथांग राजसा
नाही मज उमगले
तुझ्या जीवनी येण्याचे
स्वप्न अधुरे राहिले
साधीसुधी वेडीखुळी
अल्लडशी मी प्रेमिका
नाही व्यवहार रीत
मज प्रेमभंग शिक्षा
उमलले प्रीतफूल
गंध दरवळे मनी
थांग राजसा मनाचा
अज्ञातचि मनोमनी
निमंत्रण येता तुझे
हादरले मनोमनी
दर्या उसळला मनी
प्रीत गेली उन्मळूनी
