अस्तित्वशून्यता
अस्तित्वशून्यता
संपवून टाकायची आहे
माझ्यातील शांतता मला
या शांततेने अस्तित्वशून्य केलेय मला
आतून काहीतरी कायमच पेटलेले असते...
ज्वाळांनी खरेतर वर जायला हवे
पण शांततेचा शिंपडसडा विझवत रहातो
नेहमीच ...
मग तयार होतात अवशेष एकामागून एक...
असे कितीतरी थर साचत जातात
या अश्मीभूत अवशेषांचे ...
उत्खनन करून काढायचे आहेत एकावर एक साचलेले हे थर ,
इतिहासाची साक्ष देत रहातील ते
तरीही...
मोकळं होता येइल का ते पहायचय जरा
उपसून टाकलेल्या या थरांवर अंकुर फुटतो का ते पहायचय...
नाहीतर निर्माण झालेल्या पोकळीत स्वतःला झोकून द्यायचय...
