अस्तित्व
अस्तित्व
जाणवता तुझं अस्तित्व
विसरते मी माझं स्वत्व
वाटते,तुझ्या अलिंगणात विसरून जावे जग
लुप्त व्हावे तुझ्यात ,कधी न व्हावे सजग
मनोमिलना च्या या आलिंगनात
हळूवार विहरते उंच नभात
स्वप्नांच्या मंद झुल्यावर
झुलते मी पहात तुला वारंवार
तुझ्या प्रेमाच्या या घट्ट कवेत
विसरून जाते सुख-दुःख तुझ्या समवेत
थांबना रे चंद्रा, नको ना जाऊस ढगाआड
भग्न पावेलं माझी ही स्वप्न मयी लाट
