STORYMIRROR

Arun V Deshpande

Inspirational

3  

Arun V Deshpande

Inspirational

असे असावे

असे असावे

1 min
262

सरीसारखे ते येणे असावे

आले म्हणता ते जाणे असावे


दातृत्वाचा डंका पिटणे नको

दान सदा गुप्त देणे असावे


चकाट्या मारण्यात वेळ फुका

कामानिमित्त बसणे असावे


वायफळ बडबड वृथाची

नेमकेपणाचे बोलणे असावे


वाचाळवीरास महत्व नाही

प्रत्यक्ष कृती करणे असावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational