STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Inspirational Others

3  

Prashant Tribhuwan

Inspirational Others

असा युवा घडला पाहिजे

असा युवा घडला पाहिजे

1 min
466


असा युवा घडला पाहिजे,

ज्यात असावे तेज आणि अस्मिता!

त्यालाच तर म्हणतील स्वामी,

युग प्रवर्तक या युगाचा नचिकेता!!


असा युवा घडला पाहिजे

जो काढेल समाजातून लाचारी!

झटकेल तोच धूळ या धर्मावरील,

अन् वाचवेल झालेली संस्कृती बोचरी!!


असा युवा घडला पाहिजे,

जो बनेल समाजापुढे आदर्श!

त्याच्या प्रत्येक कर्मात असेल,

समाजाचे हित आणि इशपर्श!!


असा युवा घडला पाहिजे,

ज्यात असेल दीन दुबळ्याबद्दल कळवळा!

त्याच्या सानिध्यात मिळेल,

प्रत्येकाला मुक्तीचा मळा!!


असा युवा घडला पाहिजे,

जो करेल थोरामोठ्यांचा आदर!

आणि जपेल देश आणि घरच्यांनी,

दिलेली संस्काराची चादर!!


असा युवा घडला पाहिजे,

ज्याच्यावर असेल प्रत्येकाला गर्व!

जो बदलून टाकेल विचारांनी,

हा दुबळा इतिहास आणि पर्व!!


असा युवा घडला पाहिजे,

असे प्रत्येकाला वाटते!

पण मी का न तसे बनावे,

याचेच दुःख मनात दाटते!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational