अर्थबोध
अर्थबोध
कुटूंबाच्या छत्रछायेखाली
निर्भयतेने हक्कानं जगला
भावनांच्या विश्वात जावून
आज नवा अर्थबोध झाला!!धृ!!
काळजाचा तुकडा आला
सर्वात सुंदर बाळ माझा
सुंदरता मनातील कळली
सुंदरतेचा अर्थबोध झाला..१भावनांच्या....
कळेवर बाळ खेळला
आई बाबांना विश्व समजला
त्यांच्या प्रेमात नांदला
आज प्रेमाचा अर्थबोध झाला..२
उंगूली पकडून फिरु लागला
नव्या गोष्टी शिकु लागला
तोंडामधील घास खाऊन
बंधु प्रेमाचा अर्थबोध झाला...३
छम छम छळी खाऊन
ज्ञानाचे फाळे गिरवू लागला
गुरुचे सर्वस्व ज्ञान घेवून
गुरू कळला अर्धबोध झाला...४
चांगले वाईट गुण सांगून
प्रत्येक मार्गावर सोबतीला
क्षणोक्षणी धावत येणारा
मित्राचा अर्थबोध झाला...५
एकमेकांच्या गरजा भागवून
हित स्वाभिमान मनात आला
एकमेकांचा प्रेम सहारात
समाज कळला अर्धबोध झाला..६
निर्भय आनंदी जीवनासाठी
सत्य अहिंसा मार्ग चांगला
समाज उन्नत मार्गावर नेणारा
धर्माचा आज अर्थबोध झाला...७
