अंतरात्मा
अंतरात्मा
मनात आले हळुच एकदा
मरणानंतर काय होईल
सोनपरी हळुच हसुन म्हणाली
आत्मा मी तव घेऊन जाईल
अंतरात्मा अलवार जपुन
सोनेरी कुपीत भरुन ठेवीन
मोक्ष मिळाल्यावर पुन्हा
पुनर्जन्मास तयार करीन
दुरदेशी कुणा मायपित्याच्या
परसात नव्याने तुला पाठवीन
पुन्हा एकदा तुला तुझ्याच
आयुष्याचं देण वाहीन
