STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

अंतराळवीर

अंतराळवीर

1 min
839



आवड मला भूगोलाची

माहिती घेतो खगोलाची.


जागेपणी अन् झोपेत

ग्रहगोल दिसे सतत.


एके दिवशी झाले काय

ग्रहावर ठेवला पाय.


अनोळखी ग्रह अजब

रहवासी त्याचे गजब.


वेश माझा शुभ्र ढवळा

शत्रू भासलो मी आगळा.


भय वाटले त्यांना माझे

शस्त्र घेऊनि आले राजे.


बायाबापड्या घाबरल्या

पोरांसवे मागे सरल्या.


हल्ला कराया आले पुढे

ग्रहवासी ते जाडेजुडे.


घाबरून मी ओरडलो

वाटेने पळत सुटलो.


पळताना पडलो खाली

टेंगुळ मोठे आले भाळी.


आवाजाने आईही आली

सगळी चाळ जागी झाली.


मग माझ्या आले ध्यानात

ग्रह पाहिला मी स्वप्नात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

   एक रचना माझी

  शीला अम्भुरे बिनगे

     (साद)

  परतुर ,जालना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational