STORYMIRROR

Swati Damle

Inspirational

3  

Swati Damle

Inspirational

अंतर

अंतर

1 min
667


' अंतर '

झपाट्यानं जग आज जवळ येत चाललय

इंटरनेटने विश्र्वच सारं झपाटून टाकलय

भौगोलिक अंतराचा संकोच इथं झाला आहे

पण मनामनातील जवळीकीची दरी मात्र रूंदावत आहे


पीढीपीढीतील संघर्ष पिढ्यन् पिढ्या चालला आहे

पण आज चार वर्षांच अंतरही पीढीएवढं झालं आहे

संघर्षाची ठिणगी पूर्वी होती प्रत्येक घरी

दिसली,दिसली,विझली,विझली इतपतच


पण आज ठिणगी आहे चेतलेली

क्षणांत अग्निरूप धारण करून सारंच भस्मसात

करायला टपलेली


अहो,संघर्ष कोणात नव्हता ?

भावाभावात,मायलेकीत,बापलेकात

पण,एक मायेचा पाशही होता घट्ट !

कुठेतरी एकमेकांना बांधून ठेवणारा !

ओढ होती रक्ताच्या नात्यातील बंधांची !

एकमेकांवरच्या प्रेमाची,वात्सल्याची,ममतेची !


पण आज______

मी,मी आणि मीचाच पाढा

तुम्ही,आम्ही,आपण दडून बसलेत शब्दकोषात

हमरीतुमरी नि एकेरीच्या जंजाळात

आदर आणि मानाची पुरतीच लागली आहे विल्हेवाट

भावनांची मोडतोड,मनामनांची कुतरओढ

पैशांसाठी,पैशासाठी चालली आहे चढाओढ


कुठवर भोगावं लागणार आहे हे सारं

झपाटलेल्या या जगात ना कुणाचा आधार ना मदतीचा हात

जाणते- अजाणतेपणी घरच्या आधारवडावरच केली आहे मात

देवा,तुलाच रे बाबा आता या सर्वाची लाज


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational