अनपेक्षित संकट
अनपेक्षित संकट
मुले -मुलेच घरात होतो
खेळण्यात अगदी दंग होतो
आईस्क्रीमची टूम निघताच
नील म्हणाला घरुन आणतो
तेवढ्यात भुरटे चोर
अचानक घरात शिरले
दरडावून कपाटाच्या किल्ल्या
दे लवकर म्हणाले
संजयची तर अगदी
बोबडीच वळली
इतर मुले भितीने
लटलट कापू लागली
आवाज पोचला बाहेर
नील सावध झाला
कडी लावून दाराला
काकांकडे पळाला
पोलिस आल्यावर
चोरटे घाबरले
पोलिसांना सपशेल
शरणच आले
