STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Inspirational

3  

Gaurav Daware

Drama Inspirational

अन्नदान श्रेष्ठदान....

अन्नदान श्रेष्ठदान....

1 min
931

अन्नदान ओळखीचे अनेक असतात शब्द

पण त्याची खरी किम्मत करते मनाला स्तब्ध....


त्याच्यापुढे किंमतीच्या अनेक असतात ओळी

पण मिळत नाही तेव्हा होते आयुष्याची राखरांगोळी....


अन्नानेच खरं मिळत आयुष्यात सुख संपन्न

त्यांच्यापुढे प्रत्येकाच मनही असत प्रसन्न.....


अन्नाचा मनात आदर म्हणजे मूर्खता नाही

त्याच्या आदराने जीवनाचा उद्धारच होई.....


त्याचा गोडवा असतो आयुष्याची पुण्याई

त्याच दान जीवनात खरं पुण्य मिळवून देई....


अन्न दान श्रेष्ठ दान ओळख सर्वर होई

तरी काहींना मात्र त्याची मुळीच किम्मत नाही.....


म्हणून अन्नाचा अपमान आयुष्यात कधी करू नका

किंमत ठेवा त्याची अन् खरं सुखं अनुभवून बघा...


अन्नदानाने बदलेल तुमच्या आयुष्याच्या रेखा

म्हणून आयुष्यात अन्न दान करून बघा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama