STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

अंगण..

अंगण..

1 min
297

अंगण म्हणजे

  • प्रेमाची शिंपण
  • जिवाचा सडा
  • अंगण म्हणजे
  • स्वस्तिक रेखीव
  • हळदीकुंकू देखीव
  • अंगण म्हणजे तुळशी वृंदावन
  • गायीच्या शेणाने लिंपण
  • अंगण म्हणजे
  • दिवाळीतल्या दिव्यांची आरास
  • जमलेल्या माहेरवाशीणिंच्या गप्पा खास
  • अंगण म्हणजे
  • उन्हाळ्याची निवांत रात
  • आपलं आयुष्य शोधतो लुकलुकणाऱ्या चांदण्यात
  • अंगण म्हणजे म्हणायला
  • तो असतो घराच्या बाहेरचा भाग
  • पण त्यातुनच दिसत असतो
  • घरातील माणसांच्या मनातील
  • अंतर्भाग
  • आता क्वचितच दिसतात शहरांत
  • असे अंगण
  • ज्याच्याशी वाटते आपल्या मनीचे ब़ंधन..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational