Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Venu Kurjekar

Abstract Classics Others

4.0  

Venu Kurjekar

Abstract Classics Others

अंगाई

अंगाई

1 min
140


बाळा जो जो रे....

तरूवरती टाकून माना,

वेली विसावल्या

पर्णांना बिलगून कळ्याही,

कशा सुखावल्या

तुही माझ्या कुशीत,

झोप घेई रे लडीवाळा

बाळा जो जो रे. .......१


चांदण्यांशी खेळ खेळता,

चंदामामा थकला रे

कमळातील मकरंद चाखता,

भ्रमर तोही निजला रे

खेळून तूही,भागलास छकुल्या,

झोप घेई आता

बाळा जो जो रे. .......२


घड्याळाची टिकटिक आता,

स्पष्ट येतसे कानी

रातकीडे ही कशी बघ,

गुणगुणू लागली गाणी

निजपाखरे डोळ्यांवरती,

करती बघ दाटी

बाळा जो जो रे. .........३


उमलून आली रातराणी,

पसरवीत अपूला गंध

खट्याळ वारा दमूनी आता,

वाहू लागला मंद

भारीच अवखळ तू रे तान्हुल्या,

झोप घेई आता

बाळा जो जो रे. ..........४


वेडी ही आईची ममता,

विश्व तुझेची माझ्या चीत्ता

मनास धीर ना, तुज काही होता,

संजीवनी तुज लाभो सानुल्या

संजीवनी तुज लाभो,

कुणाची दृष्ट ना तुज लागो

बाळा जो जो रे. ........५



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract