STORYMIRROR

Venu Kurjekar

Others Children

3  

Venu Kurjekar

Others Children

विसरलो आम्ही

विसरलो आम्ही

1 min
154

यंत्राभोवती आपली दुनिया,

मुलांनो ही विज्ञानाची किमया.....


गरगर गरगर गिरणी फिरते,

क्षणात सरसर पीठ सांडते.

विसरलो आम्ही, जात्यावरच्या ओव्या,

ही विज्ञानाची किमया. ............


कळ दाबता अवखळ पाणी,

खळखळाळत पाटामधूनी,

पीकाशी भेटाया जाते.

विसरलो आम्ही, मोटेवरची गाणी. .......


झुकझुक झुकझुक अगीनगाडी,

वेगवान ती मोटारगाडी,

झुऽऽई आकाशी विमान भारी

विसरलो आम्ही, रंगीत गाडी अन् खिल्लाऱ्या बैलाची जोडी..........


हाती आले मोबाईल यंत्र,

बदलून गेले जगण्याचे तंत्र,

काॅल, मेसेजेस यत्र तत्र,

विसरलो आम्ही, हरवलेले मामाचे पत्र. ......


विज्ञानाची धरूनी कास,

प्रगती आम्ही केली खास,

विसरलो आम्ही पर्यावरणाचे भान

विसरलो आम्ही माणुसकीची जाण .......



இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை