अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
एकदां अचानक काय झालं
काळं मांजर मला आडवं गेलं
काम सोडून मी पाठी फिरले
विचार मनी माझ्या करत राहिले
ह्यांत बिचाऱ्या मांजराचा काय दोष
उगाचच पत्करायचा बिचाऱ्यांचा रोष
देवाने थोड्यांना काळे केले
थोड्यांना गोरे-गोमटे ठेविले
काळा रंग हा मांगल्याचा, पावित्र्याचा
काळा रंग हा संक्रांतीच्या चंद्रकळेचा
मंगळसूत्राचा पण काळाच रंग
काळ्या रंगाने काम कसे होते भंग?
असावे आपले दिलदार मन
तेच खरे माणसाचे मोठे धन
अंधश्रद्धेचे विचार बाजूला करा
चांगल्या विचारांची कास धरा .
