अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
घेऊन जगतात माणसे
एक अंधश्रद्धा मनात
काही लोक करतात
जनजागृती या जनात
पण काय आहे अंधश्रद्धा
हे आधी जाणून घ्यावे
जे करेल आपले नुकसान
त्याला इथून हाकलून द्यावे
जी ठेवता श्रद्धा तुम्ही
विश्वासाविना अंधश्रद्धा ती
कधी ठरेल पूरक जीवनी
कधी घातक सुद्धा ती