अंधारी रात्र.....
अंधारी रात्र.....
अबोल असते थोडी अंधारी रात्र
वाईट गुणांची ही पूर्णच पात्र
स्वतःजवळ सगळ्यांचे वाईट सूत्र
ही खरंच जपून ठेवते मात्र....
आजच्या जगात आहे सगळे विचित्र
कारण लपलेल आहे सगळ्यांच चरित्र
इथे नाही स्वभावावर कुठलंही अस्त्र
गुन्हा करून विसरणे झालंय सूत्र....
थोडी अबोल थोडी भयावह रात्र
इच्यापासून लपत नाही कुठलंही पात्र
इला माहिती असत सगळ्यांच चरित्र
थोडं वाईट आणि अबोल मात्र....
अंधारात काळ्या मनाचे सगळ्यांचे वस्त्र
मनातलेच शब्द बनतात मारणारे शस्त्र
ही थोडी अबोल आणि भयानक रात्र
इच्यापुढे नाही चालत कुठलंही शास्त्र....
तसें या जगात गुन्ह्याचे सगळेच पात्र
घेऊन आपल थोडं अबोल चरित्र
अंधार देतोय प्रत्येकाची साक्ष मात्र
बनून अबोल अन् थोडी अंधारी रात्र.
