STORYMIRROR

Ramesh Sawant

Abstract Inspirational

2  

Ramesh Sawant

Abstract Inspirational

अंधारात दडलेला सूर्य

अंधारात दडलेला सूर्य

1 min
14.3K


तेवढंच एक पाहिलं होतं

माणसासारखं जगण्याचं स्वप्न

मात्र जगायचं राहून गेलं 

हवेत उडून जाणाऱ्या पाखरागत

कधी दिवसभर जागेपणी

तर कधी साखरझोपेत 

डोळे टक्क उघडे ठेवून

बघत होतो माझं मलाच

पण दिसलो नव्हतो असा 

जसं जीवन जगलो होतो

आता अशीही माणसं दिसतात 

ज्यांच्या जागत्या डोळ्यांत मिरवत असते

त्यांच्या अर्धवट स्वप्नांची वरात

आणि माझ्या जगण्यात मात्र

बहरून येतं एक स्वप्निल आकाश

जागत्या अंधारात दडलेला सूर्य घेऊन

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract