STORYMIRROR

DHANSHRI KABRA

Inspirational Others

4  

DHANSHRI KABRA

Inspirational Others

अंधार!!

अंधार!!

1 min
248

दिवस निघून जातो,                                मावळत्या सूर्यासोबत अंधाराची चाहूल देऊन जातो,

उजेडासोबत प्रकाशाचे महत्त्व समजावून जातो,

गडद काळोख्यासोबत श्रेष्ठ अंधाराकडून धडे घेण्या सांगून जातो,


विश्वभर नाकारल्या जाणाऱ्या अंधाराच्या आत्म्याचे गाऱ्हाणे ऐकून तर पाहा,

प्रकाशाएवढे याचेही श्रेष्ठत्व कधी तरी समजून तर पाहा,

जगभर प्रत्येकाचा एकच ध्यास कधी न मिळावी अंधाराची साथ,

या अंधाराचे ही आहेत काही सद्गुण कधी तरी उमजुन तर पाहा,


या अंधाराचे काय करावे वर्णन नसता हा तर उज्ज्वल पहाटेची स्वप्नं तरी पडावी कशी...

नसती या अंधाराची साथ तर शुभ्र टीमटीमत्या चंद्र-ताऱ्यांची ओढ जीवा कळावी कशी...


नसती सोबत अंधाराची या तर स्पर्धेच्या युगात मनाची ओढ हृदया जाणवावी कशी...

नसती मैत्री अंधाराशी तर एकटेपणाच्या कचाट्यात पडून आपल्या माणसांच्या सहवासाची किंमत समजावी कशी...


नसती परक्या या अंधाराची मैफिल तर कडू गोड आपल्या हक्काच्या आठवणींची उजळणी व्हावी कशी...

नसती या अंधाराची शांतता तर आनंदमयी भविष्याच्या काल्पनिक जगतात रमण्याची संधी मिळावी कशी...


नसती मिळाली डोळे मिटून अंधाराची साथ तर विचारातून शब्दांची रचना व्हावी कशी...

नसती या अंधाराची शिकवणी तर आयुष्यात यशस्वी होण्याची वाट शोधण्याची गरज भासावी कशी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational