अंधार सारु दूर
अंधार सारु दूर
अंधार सारु दूर
पणती पणती दारोदारी
ज्योत झळकली तेजाची
अंधाराला सारुन दूर
दिवाळी आली आशेची
दिवाळी सणात घरोघरी
वाढली पणत्यांची किंमत
एकजुटीने पळविला काळोख
इवल्यां पणत्यांची हिंमत
माणसाच्या मनातही दाटला
विषमतेचा काळोख आज
दीप पेटवून समानतेचा
माणुसकीचा देवुया साज
आज नशिबाने भरलेली
असली आमची ओंजळ जरी
थोडे सौख्य वाटु चला
हीच समानतेची सुरुवात खरी
