अनाथ
अनाथ
जन्मताच अनाथ होणा-या
बाळाबद्दल ऊगाच पुळका येतो लोकांना.
खर प्रेम तर बोटावर मोजण्याईतकेच करतात.
अंपग असनाऱ्याबद्दल ऊगाच
असतो मनात तेवढ्या पुरता भाव
पण!
अपंगच मानुस मला सक्षम वाटतोय.
गर्भपिशवी भाड्यानी देनारी आई
त्या नंतर हौसेनी मिरवनारा समाज.
प्रेम केल्यावर जन्मास येनारी मुले
अनोरस ठरतात..
जन्म तसाच तीच भावना..
सर्व यातना कळा..त्याच..
भोगनारे भोगून जातात..
आणि त्याच भोगनाऱ्या समाजात त्याला/तिला सोडल जातं रसत्यावर.
कुठली ती ममता? कोणत ते प्रेम?
बरबटलेला समाज असा जिवंतपनी हत्या करतो..
जीवंत मानवाची.
