अन् हा तोच का?...
अन् हा तोच का?...
तू पाठमोरा वळता तुला मी आवाज दिला
ऐकुनी तू एकदाही ना होकार दिला ...
बोलायचे होते मला खूप काही
पण तू ना ओळखीचा भास दिला...
वागणे पाहुनी तुझे मन मोडले माझे
अन् हा तोच का ? ज्याने प्रेमाचा हात दिला...
तरी का ? कुणास ठाऊक राग येत नाही मला तुझा
कारण तूच तो ज्यांने प्रेमाचा सुखद आघात दिला...
हिनवतात मला लोक वेड्यातही काढतात
का ? तू असे बोलायचा त्यांना अधिकार दिला...
विश्वास प्रेमावर नाही असे म्हणणार नाही मी
प्रेमात धोका मी नाही तू दिला...

