अकस्मात...
अकस्मात...
धावता धावता अकस्मात
जगणे थांबून गेले
मी, माझे करता करता
नव्याने "आम्ही" परत आले
पैसा पत जपता जपता
माणुसकी आटली होती
भयावह लाट आली
माणसे स्नेहाने जवळ आली
तुझं-माझं करता करता
आपलं सारं जमून आलं
धावपळीत हरवलेले संसारसुख
आपुलकीने पुन्हा चिंब न्हालं
ऐक्य स्नेह वात्सल्याची रुपेरी
ऊंच जुळली कमान जराशी
मतभेद क्षणात विरले सारे
जुळले ऋणानुबंध मनाचे मनाशी
