अजून ही बाकी
अजून ही बाकी
अजूनही बाकी |स्वप्नातल्या गोष्टी ||
सजलेली सृष्टी |जीवनात ||१||
धावूनिया मागे |गाठावा कळस ||
नसावा आळस| स्वप्नांमध्ये ||२||
करावा प्रयत्न | करण्यास साध्य ||
वाटे जे असाध्य |साकारण्या ||३||
अजून ही बाकी | अवघड वाट||
धुके असे दाट | संसारात ||४||
प्रश्नांची उत्तरे |शोधन्या झटावे ||
पारणे फिटावे | कष्टाचीया||५||
अजून ही बाकी |आकाश झेपाया ||
ध्येयास गाठाया |उत्साहाने ||६||
जपूयात क्षण |सुंदर जीवन ||
स्थिरावले मन |सुप्रियाचे ||७||