अजिंक्य
अजिंक्य
वावटळीला घाबरून
पालापाचोळा लागला पळू
गोल गोल फिरुनी
विसावला दूरवर.
एकटेच ते उभे
राहिले जाग्यावर.
परतुनी सोसाट्याचा वारा
उडू लागला कचरा सारा.
तरीही ते स्तब्धच
राहिले जमिनीला खिळून.
जोराच्या जलधारांनी
केले कमकुवत फांद्यांना
काहींनी सोडली साथ
तरीही ते शांतच बुंध्यासमवेत.
न डगमगता न घाबरता
शत्रूंशी सामना करून
जणू राहिले अजिंक्य.