STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Thriller Others

3  

sarika k Aiwale

Tragedy Thriller Others

त्या रात्री

त्या रात्री

1 min
223

दिसाच्या प्रकाशात

घोर अंधारला काळोख

रातिच्या अंधाराला

दोष तो द्यावा .. कशाला

नेटाची होती पाऊलवाट

ओळखीची झाड वेलिही

चालता चालता सहजच

कानात पान कुजबुजली

जपून चाल जरा पोरी

काळ तुझी वाट पाही

चन्द्राच्या छायेत जाणवते

सावली दिसात हरवली

उजळली माळराने ही

बहर जीवनी पुन्हा नाही

संग कोरड्या भावनेचा

ती रात्र पुन्हा नको ना

रात्री अपरात्री भास होतो

जिवाच भय इथ संपत नाही

अशीच भयानक त्या रात्री

जिवंत मरण जगते तिही

काही काळ अशांत वादळ

अस्त्व्यास्त होत जीवन..

कोमल नजर होते निस्तेज..

ती जिवंत, मरण जगुनही

काळ पदरात घेऊन जगते

भय तिला कशाचे वाटते

अश्या अनेक भयाण रात्री

अमावस्या म्हणून जागते

स्वप्न ते उराशी नित्य होते

दव बिंदू सम पापणिला

काळ रात्रीची गोष्ट घडली

ते सूर्यकिरण त्या साक्षीला

अभय नाहीच मनी कशाचे

भावते ना नजरेत क्षितिजही

थिजली तयापुढे काळरात्री

भाव मेला होता त्या रात्री...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy