प्रवास...
प्रवास...
तो दिवस आणि तो प्रवास
होता खेळ मांडला साराच
मुजोर होता संध्या जराशी
तू ही फिरवले तोंड उशाशी
खेद मनी या इतका सखोल
वाटे जीव घ्यावा तत्काळ
चालता संगे वादळ माझ्या
बिखरली होती रानीवनी
तो दिवस अन तो प्रवास
नाही विसरता विसरत
डोळ्यादेखत जाहली होती
गरिबीची अशी मज ओळख
उन्ह पावसात चिंब होती
नभधरती सार डोईवर घेतली
आयुष्याच्या आशेत बहुदा
सारी कोवळी सावली ती रुसली
तप्त होती वाट संगतीस
भुकेचा तो ताप प्रहरात
हातावर घेत कुटुंबे निघाली
जीव भर उन्हात प्रवासास
तो दिवस अन तो प्रवास
नाही विसरता विसरत
माणुसकीचा झरा अखंड
खंडीत होती सरकारी मदत
जीव मुठीत घेउनी चाले
संगे काष्टाची होती साथ
विषारी विहार तो वायूचा
झळ आयुष्यास लागली
पायपीट ती आठवडे चार
पायास चाक बनवुनी गेली
तो दिवस अन् तो प्रवास
नाही विसरता विसरत
