साय फाय
साय फाय
मनात माझ्या शब्दांचे
द्वंद्व सुरू होते
शब्दांचे साय फाय
कसे देता येते
'चला 'शब्दाचा अर्थ
जाण्यासाठी की निरोपासाठी
'येतो 'म्हणजे बरोबर
जाऊ की निरोप घेऊ
माफी नसते
कोणत्याही चुकीला
एकदाच झाली तर
हरकत कशाला
टाटा करतो प्रेमाने
बाय म्हणताना निरोपाने
यात नसते का
जाणीव ती आपलेपणाची
का होते तगमग
आपल्या जीवाची
शब्दांचा हा खेळ सारा
सायफाय करून पूर्ण करा