जन्मदाते
जन्मदाते
नाही दोष जन्मदाते
निरपराध तुझी लेक
गर्भातल्या कळीची
विनवणी जरा ऐक॥१॥
जगात मान मिळाला
आई म्हणून घेण्याचा
जडले नाते तुझ्याशी
आनंद वाटे तयाचा ॥२॥
नाजूक तुझा स्पर्श
मज सदा जाणवतो
स्पंदनाचा अर्थ मज
अंतरीला उमगतो ॥३॥
तुझी लेक लाडकी
घेते धडे उदरात
मागणे एक मागते
माणून घे पदरात ॥४॥
बहरू दे अंगणात
तुझ्या या अंकूराला
शिंपूनी गंध प्रेमाचा
उमलूदे या कळीला॥५॥
नको घाबरू कोणाला
दैत्य निवारणी तू
कौशल्य दाखव तुझे
जगत तारिणी तू॥६॥
