ऐतिहासिक
ऐतिहासिक
ऐतिहासिक जमान्याने टाकली कात आपली ...आधुनिक जमान्याने नवी वाट धरली ...
काळ बदलला तशी माणसं ही बदलली ...
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी .....
काय ते दिवस होते विचारा आजी आजोबांना ....
सांगतील सुख म्हणजे काय असतं जे जगले होते त्यांनी
पूर्वी नव्हती आधुनिक सोयीचा गधं
म्हूणण होते त्याचे जीवन तंदुरूस्त
पूर्वीची घर उभी असतं प्रेम माया आपुलकीच्या भितींवर ...
आताची काँक्रीटच्या जंगलावर ....
अंगण आता दिसू लागलं गॅलरी च्या रूपात ....
बहरत्या मोठया तुळशीवृंदावनाला मिळालं छोटं रूप ते झुलत आता गॅलरी च्या कोपऱ्यात ...
पूर्वी माजघर स्वयंपाक घर बैठी खोलीत होता
माणसाचा सहवास आताच्या रूमांना इंटिरियरचा साज ...
पूर्वीच्या मोठ्या टीव्हीची जागा घेतली भितीवरच्या टीव्हीने
ग्रामोफोन रेडिओ आता कोण वापरत नाही आता पाय थिरकतात होम थेटरच्या आवाजांनी
चुलीतला जेवणाची चव आता नाही विजेवरच्या शेगडी वर असते जेवण करण्याची तयारी
थंडाव्यासाठी नाही कोणाच्या घरी माठ आता असतो फ्रीझच्या थंडाव्याचा घाट ....
वरवंटा आता दिसतो कोपऱ्यात मिक्सरचा आवाज घुमू लागतो घरात
पूर्वी बसायची जेवणासाठी पंगत मोठी आत्ता जेवण्यासाठी नसतं कोणी
जो तो आपल्यात असतो व्यस्त भूक लागली कि करतात वेफर्स फस्त
पूर्वी असायची माणसं घरात शंभर साठ आता असतात इन मिन चार
पूर्वी मुलं आजीच्या गोष्टी ऐकल्याशिवाय झोपत नसंत
आता झोपतात मोबाइल वर गेम खेळत
पूर्वी सणासुदीला घर भरून जाई
आता कोणाला कोणाकडे पाहायला वेळच नाही
पूर्वी आधुनिक सुविधा नसल्याने गप्पा गोष्टीत रमायचा वेळ
आता सुविधा असूनही दुरावत चाललेत नात्यांचे मेळ
