ऐक तू जरा माझे....
ऐक तू जरा माझे....
ऐक तू जरा माझे,
मन पाखरू होऊन,
गोड सुखाचे तराणे,
गंध भारल्या मनानं!!
गंधाळल्या सुगंधाने,
मोहरले अंग माझे,
विसावण्या चंद्र करी,
आतुर बाहू पसरून !!
दाही दिशांत भरून,
सदा राही प्रेम माझे,
साद घाली आर्जवाने,
ऐक तू जरा माझे!!