ऐक मतदारराजा
ऐक मतदारराजा
सय येते गरीबाची
फक्त निवडणूकीला
मतासाठी येरझारा
खेळ मतांचा मांडला
राही उपाशी बिचारा
नाही कधी वास्तपुस्त
ऐशाराम मजेमधे
मेजवानी झोडी सुस्त
अन्न वस्त्र नि निवारा
आद्य गरजा भागेना
मत द्यायला तरीही
आला मतदारराजा
राजा दाव आता तुझे
नकारात्म मतदान
नको मजला कुणीही
कर असे मतदान
धडा मिळेल लंपट
स्वार्थी उमेदवारांना
रामराज्य आल्यावरी
कर खऱ्या मतदाना
