अहंकार
अहंकार
अहंकार मातीत मिळवतो.
संस्कार आदर्श घडवतो.
ही शिकवण माझा बाबा सांगतो.
गुलाम आहे आम्ही पैसाच्या लाचारीणे.
कोणाच्या शेपटीवर चुकून पण पाय न देणे
जर जाणूनबुजून कोणी दुखवले,
तर सरळ त्याच्या नरडीवर पाय देणे.
गुलाम आहे आम्ही पैशाच्या लाचारीने.
मनाचे धन मोलाचे, कर्म करीत नीतीमत्तेने
पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करतोय खाली मानेने
साहेब नजरेतून उतरला तुम्ही खोट्या अहंकाराने.
चार पैशाचा माज तुमचा
त्याहून जास्त आहे रुबाब या गरीबाचा
छोट्या छोट्या गोष्टीवर करता अपमान आमचा.
ठोकारले तुमचे काम ठोकरले तुम्हाला.
पुन्हा,विचार येतो मनात आणि आठवतो हप्ता कर्जाचा.
सुख कोणत्याही गोष्टीत मिळते
वाईटाने मिळवलेत तरी मिळते
सत्याने भागवलेत तरी हृदयी रुजते.
मी पणा आणि अहंकाराने नाते तुटते.
जिथे सारे नष्ट होईल निरंतर फक्त माणुसकी राहते.
