अहं ब्रम्हास्मि
अहं ब्रम्हास्मि
बोलणारे बोलत राहतात
ऐकणारे ऐकत राहतात
दुसऱ्यांच्या पाप आणि पुण्याचा
उगीच हिशोब मांडत राहतात,
तू कोण आहेस
तुला माहित आहेच
मांडू दे हिशोब त्यांना
तू सतत चर्चेत आहेस,
कित्येक सुरमयी संध्या
तुझ्याच आठवणीत रंगल्या
उचक्या असतील असंख्य लागल्या
पण तुझंच आयुष्य वाढवून गेल्या,
हे हिशोब बघणं
एकदा सोडून पहा
बनू दे सगळ्यांना चित्रगुप्त
तू 'अहं ब्रम्हास्मि' म्हणत रहा.
