STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

4  

Bharati Sawant

Inspirational

अगं सखी

अगं सखी

1 min
462

जोवर सोपवत नाहीस बाई

धुरा दुसऱ्याच्या खांद्यावर

नाहीच होणार तू मोकळी

पाखरे बसणारच फांद्यावर


अगं घेतलेस बघ तुच तुला

कामाच्या पाशात गुंतवून

कशी निघणार बाहेर सखी

असल्या या रामरगाड्यातून


पाहा जरा तरी स्वत:कडे बाई

अकाली आलेय तुला वृद्धत्व

का वाटते सखी तुला आता

तुझ्यामुळेच संसाराला पुर्णत्व


शिकव जबाबदारी या पिढीला

आहेत पाखरंही खुपच हूशार

पेलवतील ते ही हे कार्य नेटाने

बन आता तू कुशल सल्लागार


कार्यालयातील अवघड कामही

करतात सगळीच चुटकीसरशी

पाहा देऊन जबाबदारीचे ओझे

मिळवतील चतुराईने ते सरशी


मुक्त होऊन मार उंच तू भरारी

टेकू दे आकाशाला तुझेही हात

जोडीदाराचीही मिळेल तुजला

संगतीने बरोबरीनेच बघ साथ


जपले होतेस मनाशी सदा तू

स्वप्न गरूडझेप नभी घेण्याचे

मिळव साफल्य तू या वयातही 

बळ आहेच तुझ्यात उडण्याचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational