अॅडमिनराव बाई साहेब
अॅडमिनराव बाई साहेब
गल्ली बोळातले कट्टे
मॉर्डन झाले आहे
झाडा खालचे
नुक्कडवरच्या चाय टपरीवरचे
पानटपरीवरचे
डिजिटलाईझ झाले!
कट्ट्यांची नाव
तीच जुनी ओळखीची
सोशल मिडियावरती
आपलेपण जपलेली
गप्पा नुक्कडवरच्या
या कानाच्या त्या कानाला
जात नव्हत्या तेंव्हा
पण आता तर
प्रायव्हसी सिक्युअर
असतांनाही क्षणात व्हायरल होतात!
व्हाटस् अॅप वर हक्काचा कट्टा स्थापला
दात दाखवणारा, रडणारा इमोजीराव समोर आला
हक्काच काही कोणा जवळ मनमोकळेपणे बोलायच
राहुनच जात फॉरवर्डच्या नादात!!
चुकून वाढदिवसाला शुभेच्छा देण्या एवजी श्रध्दांजली वाहिली जाते,
श्रध्दांजलीला अभिनंदन केल्या जात
पुढच्या आयुष्यासाठी अॉल द बेस्ट केले जाते!
कोणी वटारले डोळे तर त्यालाच दरडावले जात!
प्रेमाच्या आपुलकीच्या चार गोष्टी बोलण्या एवजी
शाब्दिक वाद विकोपास जातो
अॅडमिनराव बाईसाहेबांनाच सर्व जबाबदार ठरवतं
बनते नियमावली कट्टासाठी
पण कोण एकत त्या अॅडमिनराव बाईसाहेबांचे?
तुम्हीच सांगा तुमच्या अनुभवावरून, कोण एकत त्या अॅडमिनराव बाईसाहेबांचे?!!
