अदृश्य मनाच्या वेदना
अदृश्य मनाच्या वेदना
वारा वाही दिशा दाही
न दिसे इथल्या तो कुणा
असती याही तशाच
काही अदृश्य मनाच्या वेदना...
जाळती आतून टाकती करपून
कधी प्रकाशातही ती वाट सापडेना
मांडती खेळ अश्या कश्या
ह्या अदृश्य मनाच्या वेदना...
असूनही फुले दिसती काटे
लागतेच चालावे वाटे परतवेना
टोचले कितीही काटे तरीही
अदृश्य मनाच्या वेदना...
ठेचकाळलो कित्येकदा वाटेवरी
दगडांनीही केले बाजूस पायांना
धावतच राहिलो ठेवून
तरीही अदृश्य मनाच्या वेदना...