अधाशी ध्येय..
अधाशी ध्येय..
अधाशी ध्येय..
स्पर्धेच्या या युगात
यंञवत मानव होई
माणुसकी काय असते
पारचं विसरुन जाई
दाम करी काम
हेच जीवनाचे सारं
काय करु नी काय नको
ध्येये झालीत फार
अचुक निशाण लागेना
ध्येयही पिच्छा सोडेना
मग स्वप्नांच्या गर्दीतले
एकही स्वप्न पुरे होईना
पैसा पैसा करताना
जीवाचा सौदा होई
मरणाचे दुख:ही कोडगे
माणुस धावत राही
मदतीच्या आकांताने
गरजवंत साद घाली
परी पैसाच मोठा या जगती
नेई निष्पाप जनाचे शव
परी पैसाच मोठा या जगती
नेई निष्पाप जनाचे शव...
