अबोला तूझा
अबोला तूझा


एकटेपणाचं सावट आता नको
तुझ्यावाचून हे जगणं नको
अबोला तुझा आता बास झाला
श्वास माझा बघ रयाला गेला
तुझं गप्प बसणं सोसवत नाही
शिवलेले ओठ उसवत नाही
इतकी का रागावलीस सखे
रूतू दे मला शब्दांची वाघनखे
झेलीन तुझा रूसवा अलगद
पण नाराजी तू सोड
हसऱ्या चेहऱ्याने आता तरी
मौनव्रत तुझे तोड