अबोल प्रित
अबोल प्रित
तुझ्या प्रेमाच्या साऱ्या गप्पा पोकळ
तुझ्या प्रेमाची वचन ही निष्फळ
तुझ्यावर मी चिडते ओरडते
माझी तळमळ तुला न कळते
उडे प्रेमावरचा विश्वास सारा
वाटे हाच का तो प्रियकर खरा
कधी कधी मात्र वेगळ घडतं
मन हे उगीच अबोल बनतं
आता तुझी चालु होते गडबड
मला खुष करण्याची धडपड
अशी प्रेमातली अजब गाऱ्हाणी
माझ्या अबोल प्रितिची ही कहाणी
