अबोल आठवण
अबोल आठवण
अबोल असत प्रेम अन्
अबोल त्यातली भावना
थोड्या हातभर हृदयाची
कसली यार ही यातना
शब्द संपतात ओळी संपतात
आठवण काही संपेना
प्रेम आहे की केवळ व्यसन
याच्याच केवळ वेदना
अबोल क्षणाला धरून बसाव
की आठवाव्या फक्त यातना
प्रेम आणि यातनेच अजब कोड
माझ्या बुद्धीने काही सुटेना
थोडं हरपत थोडं रुसाव
यासाठी मनही मात्र मानेना
दाखवावं ओठांवर नाटकी हास्य
हे माझ्या हृदयाला काही जमेना
तिला आठवून डोळे पुसावे
पण अश्रू काही थांबेना
विचार करून तिला हृदयात बसवावं
पण हृदयही आता तिला घेईना.

