अभिशाप
अभिशाप
काही रितेपण...
काही अनामिक हुंदके...
तडे गेलेलं मन
अन्
मनात
खोलवर रुजलेले रितेपण,
मन तळाशी असलेली खंत...
भाळावरील रेषांमध्ये अडकलेल्या
असंख्य विचार शृंखला...
नशिबाचा फेरा म्हणून नावाजलेला
अभिशाप घेऊन फिरत आहेत
अश्वत्थाम्याच्या वंशजासारखे ..!
