अभिमान
अभिमान
घेऊन हात हाती आज ही, शपथ सारे घेऊ
ह्या एकीने भारत देशा, सप्तद्वीपांपार नेऊ
लढले अनेक देह आजच्या, स्वातंत्र्यपर्वासाठी
युगे लोटतील तरी तयांची, आठवण मनात ठेवू
इंच इंच भूमी सांगते, शौर्याची आगळी गाथा
ज्वाज्वल्य हा इतिहास आपला, मनामनांत रोवू
येथेच जन्मले कित्येक, वीर प्रतापी धुरंधर
उमेद नव्याने उठण्याची, यांच्या पराक्रमातून घेऊ
आनंद नव्हे अभिमान असे, जन्म भारतभूमीवरला
पुन्हा पुन्हा आनंदाने, येथेच जन्मून येऊ