अभिमान मराठी
अभिमान मराठी
येेेत नाही इंग्रजी त्याची
लाज बाळगायची कशाला
हिंमत लागते गड्या
स्वतःची भाषा जपायला
म्हटले कोणी अडाणी
पर्वा नाही जीवाला
ही भाषाच आणतेे धार
आमच्या या लेखणीला
राग नाही आम्हाला
कुुुणी गावंढळ म्हटल्याचा
गर्व आहे आम्हाला
आम्ही मराठी असल्याचा
