आयुष्यात काय साधलं?
आयुष्यात काय साधलं?
आयुष्यभर मेहनत करून
कमावण्यात वेळ घालवला...
कळलंच नाही पुढे सरले आयुष्य
कधी म्हातारपणात प्रवेश केला...
आयुष्याची गणितं मांडत मांडत,
घर संसाराला वेळ नाही देता आला
खूप कमावलं खूप कमावलं,
पण काय गमावलं ...याचा विचारच नाही केला
मुलांना मायेनं अंगा खांद्यावर खेळवून ,
बाप होण्याचं सूख काय ?.. ..हे गमावलं...
बायकोशी दोन गोष्टी प्रेमाच्या बोलून
नवरा बायकोच्या गोड नात्यातलं सुख घालवलं...
म्हाताऱ्या आईबाबांची काठी,
त्यांचा आधार त्यांच्यापासून हिस्कवला,
कमावण्याच्या मागे,खूप मिळवण्याच्या नादात
स्वतःसाठी जगण्याचाच बळी घेतला...
आता म्हातारपणात विचार करून
बेरीज वजाबाकी मांडत बसलो... काय मिळवलं?
जीवनातलं खरं सुख गमावून बसलो..
आता कळतंय... काय काय गमावलं,काय साधलं..
