STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

आयुष्याच्या पलीकडे...

आयुष्याच्या पलीकडे...

1 min
208

मी संपता संपता पुन्हा उरायला लागलो ,

मरत होतो तेव्हा आणि पुन्हा जगायला लागलो ...

वेळ अशी होती जेव्हा आयुष्यातून प्रेम उडाले ,

ही वेळ अशी जेव्हा प्रेम भेटता आणि पुन्हा जगायला लागलो ...

विस्कटलं आयुष्य तेव्हा गुंता झाला मनाचा ,

गुंता सोडवायला लागलो आणि पुन्हा जगायला लागलो ...

तू आलीस आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली ,

तुझ्या प्रेमात भिजून झिरपलो आणि पुन्हा जगायला लागलो...

मी उरलो नव्हतो रोमरोमाचा धुर झाला होता ,

तू ठिणगी पेटवली आणि पुन्हा जगायला लागलो ...

शब्द कुठे सुचत होते मला जेव्हा धोका मनाने खाल्ला ,

तुझ्या वळणावर थांबलो आणि पुन्हा जगायला लागलो ...

अशक्य होतं माझ्यासाठी पुन्हा प्रेमात पडणे ,

पण तू समोर आलीस आणि पुन्हा जगायला लागलो ...

अतीशोक्ति नाही ही किंवा प्रेमही म्हणणार नाही ,

तुझ्यात उमेद दिसली आणि पुन्हा जगायला लागलो ...

कोण म्हणतं प्रेम एकदाच होतं प्रेमात पडल्यावर कळतं,

पुन्हा उमलली ती कळी प्रेमाची आणि पुन्हा जगायला लागलो...

ऋतुचक्र हे बदलणारे क्षणाक्षणाला ऋतू बदलतो तेव्हा ,

बहरणाऱ्या तुझ्य ऋतूत मोहरून आणि पुन्हा जगायला लागलो ...

आयुष्याच्या अलीकडेच घेतला निरोप मी सर्वांचा ,

तु हात धरून नेलसं क्षितीजा पलीकडे आणि पुन्हा जगायला लागलो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract