STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आयुष्याची पाटी

आयुष्याची पाटी

1 min
243

आयुष्याची पाटी कोरी

कर्तृत्वाने रेखायची

सुख-दुःख सोबतीला

समानच मानायची


कधी हसऱ्या क्षणांचा

मनावरी शिडकावा

कधी हळव्या दुःखांनी

मन दर्पण तडकावा


मैत्री गप्पागोष्टी चेष्टा

मनसोक्त आनंदाच्या

बोच अपमान दुःख

अंतर्मनी सलण्याच्या


कर्तृत्वाची नोंद होते

ठळकचि पाटीवरी

भल्या-बुऱ्या कर्मांचीही

नोंद असे पाटीवरी


माया दया अनुकंपा

मनू सत्कर्मा प्रवृत्त 

देई हात गरीबाला

ठेवी जीवाला जिवंत


आयुष्याची पाटीसवे

ज्योत विझल्यावरती

चित्रगुप्त हिशेबासी

अन् प्राक्तन संगती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract