आयुष्याचा चित्रपट
आयुष्याचा चित्रपट
आयुष्य म्हटल तर सुखाची पहाट आहे
कधी दुःखाची रात्र आहे||
हा असा एक चित्रपट आहे
ज्याचा निर्माता ईश्वर आहे||
आपण एक कलाकार
कधी नायक कधी खलनायकाची करतो भूमिका साकार||
सुख, दुःखाचे प्रसंग प्रत्येक पात्राला मिळतात
आपल्या आपल्या परीने प्रत्येकजण सादर करतात||
काही अश्रू लपवून हसतात
काही कलाकार हसता हसता रडतात||
कोणी हिट आहे कोणी फ्लॉप आहे
प्रत्येकाची कहाणी वेगळी तर काही सारखी आहे ||
आयुष्याच्या चित्रपटात अभिनय करणे कठीण आहे
सस्पेन्सने भरलेला प्रत्येक सिन आहे
कधी हसवी कधी रडवी कधी मन खिन्न करणारी याची कहाणी आहे||
