आयुष्य
आयुष्य
आयुष्य न उलगडणारं कोडं
रंगबिरंगी कुंचल्यातून रेखाटीत
श्वेतश्यामल कागदासारखं उरतं शेवटी
अनाकलनीय, प्रश्न अनुत्तरित
आयुष्यात असावा अतूट विश्वास
भरभरून प्रेम देता यावं
खळखळत्या हास्यातून मांडावा विनोद
जबाबदारीचं ओझं वाहता यावं
सुखादुःखाचं नातं सुसाट वेगाने धावावं
कर्तव्याच्या धुरीवर येऊन थांबावं
जीवनाच्या तालावर बेधुंद नाचावं
सहवासाचं मोकळं विश्व हृदयाचं ठाव घेणार असावं
आयुष्य असावं मुक्या डोळ्यातील
भावना समजून घेणारं
अबोध बालकासारखं कडेवर घेऊन फिरणारं
सडा शिंपून चांदण्याचां सुगंधित घर फुलणारं
हुंडक्यांत गुंतून खांद्याला अश्रूंचं नातं सांभाळणारं
भळभळणाऱ्या रक्तावर बांध बांधू
जखमेवर काळजीची फुंकर घालू
त्याग आणि निष्ठेचे बांधू तोरण
अहंकार ,स्वार्थाला वेसण घालू
जगावे असे आयुष्य की मृत्यूलाही हेवा वाटावा
जीवनाचा रंग मुक्तहस्त उधळावा
प्रसन्नचित्ताने अडचणींवर घाव घालावा
कोण चित्रकार ह्या आयुष्याचा युगेयुगे स्मरणात रहावा
