STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे

1 min
235

म्हणतात ना किती दिवसांचे आयुष्य असते 

आजचे अस्तित्व उद्या नसते 

मग जीवन जगायचं तर 

हसून खेळून  

कारण या जगात उद्या काय होईल

 हे कोणालाच माहिती नसते 


 म्हणूनच सांगावसं वाटत ...

माणसाला सुंदर असणं महत्त्वाचं नसतं 

महत्वाचं असतं ते सुंदर नैतिकतेच

निरागस मन आणि त्यावर निर्मळ हास्य...

 मग आपल आयुष्य पण हे असंच असावं  

स्वच्छ निर्मळ पाण्यासारखं 

सह्याद्रीच्या लेण्यासारखं  


आयुष्यात आपली माणसे मिळवावी 

एकमेकांची सुखदुःखे आपणच एकमेकांना कळवावी

कधी आपल्या आवडत्या व्यक्तीकडे 

मन मोकळं करून बघाव...

 आपल्या सावलीपासून आपणच काहीतरी शिकावं 

कधी लहान तर कधी मोठ होऊन जगावं 

कधीतरी स्वतःच्या जगात राहण्यापेक्षा

 दुसऱ्यांच्या विश्वात रमून बघावं  

आयुष्य खूप सुंदर आहे मनमुराद जगावं ...


 कधी तरी हसून कधी रडून तर कधी तरी 

खूप बोलून बघावं ... कोणालातरी उगीच चिडवून बघावं

जीवनाकडे आपल्या नेहमी डोळेभरुन बघाव 

आयुष्य खूप सुंदर आहे मनमुराद जगावं  


कधी समजून सांगाव कधी समजून घ्याव

 कधी यशाची चव चाखावी तर

 कधी अपयशही निरखून बघाव

 कधी कळीसारख उमलुन फुलांसारख फुलत जाव

 क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जाव


 कधीतरी गुलाबी थंडीत आइस्क्रिम खाऊन बघाव

 कधी पावसाचे थेंब ओंजळीत 

घेऊन बालपण पुन्हा अनुभवून बघाव

अश्रू असो कोणाचेही त्याला आपणच टिपून घ्यावं 

नसो कुणी आपले आपण मात्र कुणाचेही व्हावं 

 आयुष्य खूप सुंदर आहे मनमुराद जगावं ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational